मराठी भाषा गौरव दिन

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे २४ फेब्रु.२०२२ रोजी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. कवी मुकुंद मालुंजकर (माध्यमिक विद्यालय पळसे, नाशिकरोड, नाशिक) उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने डिजीटल ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. कवी मुकुंद मालुंजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, मराठी विभागप्रमुख डॉ.अशोक भवर, प्रा.श्रीमती ललिता सोनवणे, डॉ. शरद कांबळे, डॉ. संदीप निकम  आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. ग्रंथालय दालनात ग्रंथप्रदर्शन भरवून  विद्यार्थ्यांना विविध वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले, त्याचबरोबर डिजीटल ग्रंथालयाचे महत्व ग्रंथपाल डॉ. वर्षा जुन्नरे यांनी पटवून दिले.

डिजीटल ग्रंथालयाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर  मा. कवी मुकुंद मालुंजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे

ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थीत मान्यवर  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक